न्याहळोद प्रतिनिधी : प्रत्येक व्यक्तिला व्यायामाची गरज असुन कुस्ती आखाडे (तालीम) मधील व्यायाम व कुस्तीला योग्य अंतर राखण्याचा नियम पाळून तसेच योग्य ती सर्व खबरदारी घेवुन चालु करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी कुस्ती मल्लविद्या महासंघ संघाचे मार्गदर्शक देविदास जिरे यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली सहा काही महिने सर्व जग ठप्प झालं होतं. परंतु गेल्या महिन्यापासुन सरकारने बऱ्याच गोष्टींना नियम व अटी घालुन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना केल्या जात आहेत. सध्या व्यायाम ही मूलभूत गरज बनली आहे. तालमी सुरू केल्या तर मल्लांची व्यायामाची व कुस्तीच्या सरावाची सोय होईल. मल्लांची शरीरयष्टी सदृढ राहील. आगामी काळात यात्रांचा हंगाम सुरू झाला तर त्यांचा सराव कायम राहील. अनेकांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे कुस्ती आहे. त्यामुळे लवकरात लवकर तालमी सुरू करण्यास परवानगी मिळावी.अशी मागणी कुस्ती-मल्लविद्या संघटनेमार्फत ज्येष्ठ मार्गदर्शक देविदास जिरे /न्याहळोद/यांनी केली आहे