शिर्डी | संजय महाजन
येथील श्री साईनाथ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी. डॉ.अशोक गावित्रे यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आरोग्य समितीवर निवड करण्यात आली. पुणे येथे मुख्य कार्यालयात नुकत्याच झालेल्या सोहळयात अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते डाॅ.गावित्रे यांस नियुक्ती पत्र,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यास अण्णा गुंजाळ,भरारी पथक सदस्य नागनाथ गवसाने,दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील,नंदन खरे,अमित अग्रवाल,अभिनेत्री ममता तायडे,तेजस्विनी भंडारे,न्यूज रिपोर्टर प्रीतम शहा उपस्थित होते.सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. गावित्रे यांचे अभिनंदन होत असून,त्यांस पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील मिळत आहेत.
डाॅ.गावित्रे हे मराठी चित्रपट संस्थेचे संस्थापक,अशोका ग्रामीण बहुउद्याशीय संस्थेचेे अध्यक्ष,ग्राहक प्रबोधन समिती चे राज्य उपविभाग संपर्क प्रमुख,महाराष्ट्र राज्य अश्वमेध मेडीकल ट्रस्ट,मोहन फौंडेशन आणि मद्रासचे आजीवन सदस्य देखील आहेत.
आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवुन माला जी संधी दिली आहे. यासंधीला नक्कीच न्याय देऊन कलाकारांच्या अधिकाधिक आरोग्य समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहील.बरीच वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करत आसल्यामुळे आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आरोग्य समितीला नक्कीच याचा फायदा होईल.
डॉ.अशोक गावित्रे (आरोग्य समिती सदस्य,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)