मुंबई , दि.७| प्रतिनिधी..
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स मुंबई ऑफिस आणि अॅड.विक्रांत वाघचौरे यांच्या लीगल ऑफिस मुंबईचा शुभारंभ आणि नवीन लोगो प्रकाशन कार्यक्रम झाला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे आंतरराष्ट्रीय संचालक आणि मेंबर ऑफ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (भारत सरकार) तथा प्रसिद्ध उद्योगपती डॉ.अरुणकुमार शर्मा , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे संस्थापक अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांच्या शुभहस्ते आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केतन पाटील, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी अशोक लांडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन लोगोचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे नवनियुक्त राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी अशोक लांडगे यांचा सत्कार केतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे लीगल ऍड सेल मुंबईचे प्रमुख अॅड.अभय सोडिये यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत उपस्थित मान्यवरांचे आभार देखील मानले.