शिर्डी,संजय महाजन
मंदिरे सुरक्षेच्या दुर्ष्टीने बंद आहेत या पार्श्वभुमीवर मंदिरात भक्तीला व नतमस्तक होण्यावर मर्यादा आहेत .मात्र माणसांत देव बघत जे आपले कार्य बजावत आहेत अशा व्यक्तींचा सन्मान व्हावा या उद्देशाने शिवसेना महीला आघाडीच्या वतीने शिर्डीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध, सामाजिक क्षेत्रात आपल्या घराची,जीवाची पर्वा न करता रात्रं दिवस सेवाभाव ठेवून प्रेरक कार्य करणाऱ्या महीलांना आदर पूर्ण भावनेने नवदुर्गा सन्मानाने करण्यात आले.तसेच पुरुषांना कोरोना योद्धा पुरस्कार देखील देण्यात आला. सोहळ्यात सोशल डीस्टंसीग आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे नुकतेच आयोजन माजी नगराध्यक्षा अनिता विजयराव जगताप यांनी केले. यावेळी लक्ष्मी दत्तात्रय आसणे आणि सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
कोरोना मुळे समाज हादरून गेला असला तरी शिर्डी नगरपंचायतची कोराना टीम पेंशटच्या समाजाच्या रक्षणाचे कार्य करत सेवा बजावत होते. ही बाब लक्षात घेवून त्यांना कोरोना योद्धा सन्मान देण्यात येवून यावेळी सत्कार करण्यात आला. यामुळे सत्कार मूर्ती यांचे मनोबल उंचावेल.
कोरोना योद्धा सत्कारमूर्ती यांच्या भावना – आमच्या कामाची ही पावती आहे आणि येथून पुढेही अश्याच जोमाने आम्ही सेवा बजावत कार्यरत राहू. समजाचाची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याच्या भावनांचा सुर यावेळी निघाला.
हे आहेत नवदुर्गा सन्मानित
डॉ स्वाती म्हस्के (वैद्यकीय अधिक्षक),डॉ मैथली पितांबरे (वेैद्यकीय अधिक्षक) ,जयश्री ससे (सामाजिक कार्यकर्ता),रुपाली बाविस्कर (परिचारीका),योगिता देवकर (मदतनीस हॉस्पीटल),अनुराधाताई शिंदे (अंगणवाडी सेविका),हर्षदा बहिलम (आशा वर्कर),रुपाली सातपुते (महीला पोलिस कॉन्स्टेबल),परिगाबाई भडके (स्वच्छता कर्मचारी),सुवर्णा ताकटे (महीला पत्रकार),ऐश्वर्या तासकर (महिला पत्रकार)
हे आहेत कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानीत
मुरलीधर देसले (नोडल अधिकारी),विलास भिमाशंकर लासुरे (नोडल अधिकारी ),ज्ञानदेव जवक,संग्रामसिंग रजपूत,अनिल शेळके ,संतोष शेजवळ,नवनाथ गोंदकर, रावसाहेब जावळे,रमेश झेंडे (तलाठी शिर्डी),विलास कानवडे (सहाय्यक पोलिस निरीक्षक)