Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

शिर्डी | संजय महाजन..
शिर्डी नगरपंचायत यांच्या शासकीय मालमत्तेला महापुरुषांची नावे देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिर्डी बहुजन ग्रामस्थ यांच्या वतीने शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री. डोईफोडे यांस देण्यात आले.

शहरातील रस्ते,मुख्य चौक,मैदाने, बगिचे अशा महत्त्वपूर्ण ठिकाणांना महापुरुषांची नावे देण्यात यावी.सामाजिक संस्था, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात यावा.विशेष म्हणजे,ही नावे देतांना राजकारण्यांऐवजी शास्त्रज्ञ,साहित्यिक,खेळाडू , स्वातंत्रसैनिक आणि महापुरुषांची नावे देण्यात यावी.असे निवेदनात म्हटले आहे.

अॅड.अविनाश केलसराव शेजवळ.अॅड.विक्रांत वाघचौरे. अॅड.अमोल बिडवे,अॅड.सुलेमान सय्यद.रा.स.प.चे तालुका अध्यक्ष नानासाहेब काटकर,स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिमोन जगताप,सामाजिक कार्यकर्ते विश्वास माघाडे,लहुजी सेनेचे अध्यक्ष समिर विर.रा.स.प.शहर अध्यक्ष रमेश बनकर,उमेश काटकर,संदिप काटकर,मयुर काटकर,शुभम खरात,अप्पासाहेब बनकर,विठ्ठल जाधव, सुनिल काटकर,शब्बीर सय्यद,दिलिप काटकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या ठिकाणी ही नावे देण्यात यावी- निवेदनात मागणी..
१ ) शिर्डी नगरपंचायत अग्निशमन केंद्र.नविन इमारत तथा मुख्याधिकारी निवासस्थानाला- राजमाता अहिल्यादेवी होळकर.
२)आठवडे बाजारतळास- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर .
३) उत्तर मुखी शिर्डी नगरपंचायत व्यापारी संकुल ( एअरपोर्ट रोड ) ला – राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले
४) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलास- अक्रीलिक प्लेटने नाव देण्यात यावे.
सदरील शासकीय मालमत्तेस महापुरुषांचे नावे देवून त्यांचा सन्मान करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

satta king gali