शिर्डी ,प्रतिनीधी संजय महाजन | साकुरी (राहाता)
राहुरी तालुक्यातील डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलची विद्यार्थिनी,मूळची राहता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी कु साक्षी ज्ञानेश्वर बनसोडेने या वर्षी (सन 19-20 ) १० वीत विशेष प्राविण्य संपादन केल्याने श्रीगोंदा येथे कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंसिल सदस्य आणि माजी मंत्री बबन दादा पाचपुते यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
साक्षी ला ट्रॉफी, सन्मान पत्र आणि रोख रक्कम देवून नुकताच सत्कार हा रयत सेवकांच्या उपस्थित करण्यात आला. सालाबादप्रमाणे दि रयत सेवक को ऑप बँक सातारा या रयत शिक्षण सौंस्थेच्या नामांकित बँके मार्फत रयत सेवकांच्या मुलांचा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केल्याबदल विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळावी हा प्रमुख उद्देश रयत सेवक को ऑप बँकेचा असतो आणि ती पारंपरिक धुरा प्रामाणिक पणे रयत बँक निभावत आहे.
साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे या मुलीने आज पर्यंत शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमात सतत सहभाग नोंदवून आपल्या विद्यालयाचे आणि साकुरी गावाचे नाव उज्वल करत आहे. रयत शिक्षण संस्थेचे शारदा विद्या मंदिर,राहता येथील जेष्ठ शिक्षक आणि दलित मित्र पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर बनसोडे यांची सुकन्या आहे.ज्ञानेश्वर बनसोडे यांना देखील त्यांच्या सामाजिक ,शैक्षणिक, क्षेत्रातील विषयी कामगिरी बदल अनेकदा गौरविण्यात आलेले आहे. या ठिकाणी “बाप सवाई बेटी “असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
साक्षी बनसोडे या मुलीच्या या नावीन्य पूर्ण कामगिरी बदल संपुर्ण परिसरातून तिचे कौतुक करण्यात येत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बाप बेटीचे कार्य सर्वांसाठी प्रेरक असे आहे.