शिर्डी , दि.२४ | प्रतिनिधी…
श्री साईबाबा संस्थान गेट 3, 4 खुले व्हावे आणि प्रशासनाचे जाचक निर्णय याबाबत 25 जाने.ला ठीक 6 वाजता हॉटेल सिटी हार्ट (एस टी स्टॅन्ड शेजारी) ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
शिर्डी ग्रामस्थांचे सुलभ दर्शन व्यवस्था, साईभक्तांचा त्रास कमी होण्यासंदर्भातील गेट नंबर 3 आणि 4 खुले करण्याबाबत तसेच श्री साईबाबा संस्थान प्रशासन घेत असलेल्या अनेक जाचक निर्णयासंदर्भात
विचारविनिमय करून ठोस निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
समस्त शिर्डी ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन शिर्डी ग्रामस्थ कृती समितीने केले आहे.