download
Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जळगाव, दि. 9 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परिक्षा 2021 जळगाव शहरात दि. 14 मार्च 2021 रोजी एकुण 16 उपकेंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होऊ नयेत. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होवू नयेत.यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी जळगाव अभिजीत राऊत हे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम (1)(2 व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालील प्रमाणे आदेश देत आहे.

दिनांक 14 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 वाजेपावेतो जळगाव शहरातील एकुण 16 परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही.

सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

error: Content is protected !!
satta king gali