जळगाव, दि.१ फेब्रुवारी …
सर्वंकष समाज कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या येथील लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे एल.पी. प्रीमिअर क्रिकेट लीग दि. २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान बॅरिस्टर निकम चौक (सागर पार्क ) मैदानावर ‘ सरदार वल्लभभाई पटेल ट्रॉफी २०२१ ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट सामन्यांना मंगळवार दि.२फेब्रुवारी रोजी आरंभ होत आहे. यासंदर्भात आयोजन समितीच्या वतीने पूर्वसंध्येला आज पत्रकार परिषद घेण्यात आली. जळगावकर नागरिक व क्रीडारसिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहुन या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या क्रिकेट शृंखलेचे उदघाटन सायंकाळी ७-०० वाजता भंगाळे गोल्डचे संचालक मा. श्री. भागवत गणपत भंगाळे यांच्या शुभहस्ते होणार असुन मा. आमदार श्री. सुरेश ( राजूमामा ) भोळे हे अध्यक्षस्थानी असतील तसेच याप्रसंगी माजी महापौर मा. श्री. ललित विजयराव कोल्हे , जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष मा.श्री.भालचंद्र प्रभाकर पाटील,कृष्णा पोपटीन्सचे संचालक मा. श्री. डॉ. कृष्णा चंद्रभान पाटील ,रुखमा टेन्टचे संचालक ,चंद्रकांत दिनकर महाजन,किशोर दिगंबर महाजन हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
फक्त सकल लेवा पाटीदार समाजासाठी असलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत १६ ते ५० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना खेळण्याची संधी आहे. सर्व सामने येथील सागर पार्क , कै. बँ. निकम चौक येथील मैदानावर सायं.७ ते ९-०० या वेळेत खेळविले जाणार असुन जळगावातील १२ शहरी संघ आणि जळगाव बाहेरील १२ ग्रामीण संघ अशा २४ संघांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असुन यावर्षीच्या सहभागी २४ संघात एकुण ४७ सामने खेळविले जाणार आहेत.
गृप ए ,बी, सी , आणि डी अशी संघांची विभागणी
सहभागी संघ त्याचे मालक असे.
जळगावातील संघ व त्याचे मालक —-
रिअल्टी रोव्हर्स –अभिजीत महाजन, अँड पुष्कर नेहते,
श्री काशी —अजित राणे ,
अमेय नाईट किंग्ज –अमेय तळेले,
ओम बिल्ड चॅम्प्स –निर्णय चौधरी ,
त्रिमूर्ती ब्लास्टर्स –सौरभ खडके ,
अस्मी एसर्स –अमित काळे ,
सोनी सिल्क शायनर्स –जीवन येवले ,
पूनम पेन्टस इलेव्हन –कुणाल चौधरी ,
डॉ. स्मायलिंग नीज –डॉ. मनिष चौधरी ,
मातोश्री वॅरिअर्स –डॉ. विरेन खडके ,
पूनम पेन्टस इलेव्हन –महेश चौधरी
तुलसी जेली चॅलेंजर्स — आशुतोष पाटील
जळगावबाहेरील संघ व त्याचे मालक —
सोयो सन रायडर्स — सर्वश्री . किशोर ढाके ,
पंकज टिव्हीएस स्टार्स –योगेश चौधरी ,
एबीएस जिम स्ट्राईकर्स –संदीप पाटील ,
शिवम सुपरकिंग — डॉ. पंकज पाटील ,
पद्मालय किंग इलेव्हन –शेखर अत्तरदे ,
आचार्य वॅरिअर्स –निलेश चौधरी ,
धनंजय ऍग्रो पावर –धनंजय चौधरी ,
गोदावरी फायटर्स –डॉ. केतकी पाटील ,
हॉटेल गौरव स्पार्टन्टस –योगेश पाटील,
प्लँटो टायगर्स — निखिल चौधरी ,
सिद्धी सुपर रायडर — चंदन अत्तरदे,
जय दुर्गा इलेव्हन –सुनील महाजन
स्पर्धत सर्वोत्कृष्ट प्रथम,द्वितीय,तृतीय संघ तसेच मॅन ऑफ दि मॅच ,मॅन ऑफ दि सीरिज इत्यादी निवडले जाणार आहेत. विजेत्यांना अतिशय आकर्षक ट्रॉफीज दिल्या जाणार असून, त्यासोबतच जळगावातील नामवंत जिम’एबीएस जिमचे ३ते ६ महिन्यांपर्यंतच्या मेम्बरशिपचे कुपन्स दिले जाणार आहेत. शिवाय प्रत्येक मॅन ऑफ दि मॅचला सिल्व्हर कॉइन देण्यात येणार आहे.
लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन वेळोवेळी विविध विधायक उपक्रमात आपला सहभाग नोंदवित असते. कोरोनाच्या प्रतिकुल काळातही फाउंडेशनतर्फे बहिणाबाई कोविड सेंटर यशस्वीरित्या सेवारत करण्यात आले होते.
समाजातील गरीब होतकरू खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्याल का ? असे एस बी एन टाइम्स ने विचारले असता
यावर ..वेळोवेळी सहकार्य करून उत्तम यशासाठी आयोजन समिती आणि लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन तत्पर राहून योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन आयोजन समिती सदस्यांनी यावेळी केले आहे.
फाउंडेशनतर्फे आयोजित हे क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी दीर्घ काळानंतर एक आनंददायी पर्वणी आहे.जळगावकर नागरिक व क्रीडारसिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहुन या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा सरकारी वकील अँड केतनज ढाके ब्रँड एम्बेसडर असलेल्या या फाउंडेशनच्या सदरील उपक्रमाच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी . अभिजीत महाजन, अमोल धांडे, सिंचन सरोदे, चंदन कोल्हे भूषण बढे, हितेंद्र धांडे, प्रवीण चौधरी, लीलाधर खडके, महेश चौधरी ,स्वनिल नेमाडे, सुनील भारंबे, राहुल चौधरी, शक्ती महाजन,अक्षय कोल्हे, अमोल चौधरी मिलिंद तळेले हे आयोजक यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.