शिर्डी | प्रतिनीधी..संजय महाजन..
सदगुरू गंगागीरी महाराजांनी अन्नदान आणि हरिनामीची महती जगाला सांगीतली. साईबाबांची ओळख शिर्डीकरांना करून दिली. हा आशय केंद्रस्थानी ठेऊन तयार करण्यात आलेल्या अनुबंध या माहितीपटामुळे श्री साईबाबा संस्थान आणि सरलाबेट या दोन तिर्थक्षेत्रातील स्नेहबंध आणखी दृढ होतील. तसेच या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. असे प्रतिपादन सरलाबेट येथील महंत रामगीरी महाराज यांनी केले.
श्री साई समाधि शताब्दी समितीच्या पुढाकारातून अनुबंध हा माहितीपट तयार करण्यात आला. महंत रामगीरी महाराज, खासदार सदाशिव लोखंडे, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्या उपस्थीतीत त्याचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, सप्ताह समितीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर यावेळी उपस्थीत होते.
या उपक्रमाचे संयोजक कमलाकर कोते म्हणाले, शिर्डी ते सरला बेट या अंतरातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास पिंपळवाडी, पुणतांबा, ,मातुलठाण, नायगाव, जाफराबाद व नाऊर या गावांत व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. सरलाबेट सह शिर्डीच्या विकासाला चालना मिळेल. खासदार लोखंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही तिर्थक्षेत्राचे महत्व पटवून देण्यासाठी अनुबंध हा माहीतीपट तयार करण्यात आला. तो चार भाषांत भाषांतरीत केला जाईल. तर
शिर्डीकरांच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम आहे. त्यात शिर्डी ग्रामस्थ एकदिलाने सहभागी होतील. सप्ताह समितीचे सरला बेटावर एक कोटी रूपये खर्च करून साई समाधि शताब्दी धर्मशाळा बांधून दिली हि कौतुकास्पद बाब आहे. असे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले.सुत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले.
सचिन तांबे, नितीन कापसे, धनंजय गाडेकर, सुधाकर शिंदे, किशोर गंगवाल, सतीश गंगवाल, राहुल गोंदकर महेश महाले,महेंद्र शेळके, रमेश गोंदकर , वैशालीताई गोंदकर, गजानन शेर्वेकर,रविंद्र कोते, जगन्नाथ गोंदकर, संजय शिंदे, सचिन कोते,विजय जगताप, दत्तात्रय कोते,भागवत कोते केशवराव गायके,बाळासाहेब गायकवाड, नवनाथ विश्वास राव ,जयराम कादळकर,हरिराम रहाणे,चद्रकात गायकवाड, धंनराज कोते,सुनिल बारहाते, संदिप पारख यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते.
श्री साईबाबांच्या शिर्डीसह सरला बेटाला जोडणा-या सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिडशे कोटी रूपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. या वर्षभरात पाठपूरावा करून आपण हा प्रस्ताव मंजूर करून आणू.
खासदार सदाशिव लोखंडे
दुधाळ देशी गायींचे संगोपन करून साईसंस्थानच्या वतीने दुध व गावरान तुपाची गरज भागवीली जाईल. नगर जिल्ह्यातील अन्य धार्मिक स्थळे शिर्डी सोबत जोडण्यासाठी निधी देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून शिर्डीच्या सर्वागीण विकासाला आपण प्राधान्य देणार आहोत. अनुबंध माहितीपट हि चांगली संकल्पना आहे.
कान्हूराज बगाटे- मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी