शिर्डी,दि.२५ डिसेंबर | प्रतिनिधी संजय महाजन
नमो संवाद अभियान सप्ताह अंतर्गत नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी हटवार यांच्या अध्यक्षतेखाली साइनगरी शिर्डी येथे प्रथम परिचय संमेलन झाले.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी हटवार हे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच शिर्डी येथे आले असता श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या कार्याची सुरुवात करत शिर्डी येथील परिचय संमेलनास हजर झाले. यावेळी बोलताना श्री विजय हटवार म्हणाले की, साईबाबांच्या पवित्र पावन भूमीतून बाबांचा आशीर्वाद घेत नमो नमो मोर भारतचा विस्तार करत सर्व पदाधिकारी युवा महिला पुरुष यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना स्वंयरोजगार इत्यादीवर भर देत येत्या काळात प्रशिक्षण वर्ग घेऊन पदाधिकारी व सदस्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी या माध्यमातून मी प्रयत्न करेल. माझ्यावर आपण सर्वांनी टाकलेली ही जबाबदारी मि योग्य प्रकारे पार पाडत सर्वांना न्याय देण्याचे काम जनमानसात जाऊन करेल असे सूतोवाच त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास शिर्डीचे नवनियुक्त नगराध्यक्ष श्री शिवाजीराव गोंदकर यांचा नमो नमो मोर्चा भारत मार्फत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या सत्कारास उत्तर देताना सर्वांना धन्यवाद देत, नमो नमो मोर्चा भारत ची सुरुवात ही साईबाबांच्या शिर्डीत झाली असून साईबाबांच्या शिर्डीतून होणारी सुरुवात ही कुठलीही अडचण न येता यशस्वी होते व मोर्चा भारत साठी शिर्डी परिसरातून माझे पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले. शिर्डी परिसरातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार व नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. सत्यप्रकाश सिंह- राष्ट्रीय प्रभारी तथा संयोजक यांनी आपल्या वाणीतून राष्ट्रनिर्मितीच्या ह्या चळवळीत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन करत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय मुख्य समन्वयक श्री सोपान उंडे पाटील यांनी न मोर्चा भारत संकल्पना विशद करत जनमोर्चा भारत की राष्ट्र प्रथम विचाराने प्रेरित असलेली देशातील सर्वात मोठी सामाजिक संघटना असून देशाचे वीर जवान पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी जी यांचे ज्येष्ठ बंधू समाजसेवक श्री सोमाभाई मोदी यांच्या मार्गदर्शनासाठी कार्य करत असून देशातील वीस राज्यांमधून 15 लाख सदस्य संख्या करतात सामाजिक उपक्रम मदतीचा हात पर्यावरण संरक्षण महिला अत्याचार विरुद्ध लढा शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न इत्यादी सामाजिक विषयांवर काम करत असून अजून 2024 पर्यंत नमन मोरया भारताचा विस्तार करतात दोन कोटी सदस्य संख्या गाठण्याचे लक्ष त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रीय युवा महामंत्री श्री गणेश वाघचौरे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रसाद थेट यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मोर्चा भारत चा विस्तार शिर्डी उत्तर नगर जिल्ह्यात झपाट्याने करत वर्षभरात एक लाख सदस्य संख्या घटनेचे उद्दिष्ट ठेवले सदर कार्यक्रमात राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष श्री अमन राठोड, राष्ट्रीय संघटनमंत्री श्री आर के दिवाकर, शिर्डी शहर भाजप अध्यक्ष श्री सचिन शिंदे, प्रदेश महिला महामंत्री व पालघर नगरसेविका श्रीमती अलका राजपूत, प्रदेश संघटन मंत्री श्री प्रकाश सिंह प्रदेश महिला संघटन मंत्री श्रीमती किरणताई शिंदे,प्रदेश सह प्रवक्ता श्री मनोज मिश्रा, यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी विजय जोंधळे, महिला सह संघटनमंत्री सौ मोनिका सूर्यवंशी, प्रदेश कार्यालय प्रभारी सौ पायल जैन, प्रदेश सोशल मीडिया प्रभारी अनुपमा मिश्रा, पालघर जिल्हा अध्यक्षा सौ कुसुम तिवारी, उत्तर महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्री अविनाश गायकवाड सह मान्यवर उपस्थित होते.
साई पालखी निवारा, येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनास युवा जिल्हाध्यक्ष श्री रोहित सोलंकी, श्री राकेश भोकरे शिर्डी शहराध्यक्ष, ऋषीकेश वाघचौरे युवा शहराध्यक्, रवींद्र कोळकर, अविनाश कोते, मयूर लहामगे सह शिर्डी शहर व उत्तर नगर नमो नमो मोर्चा भारत च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.