मुंबई, दि.६ डिसेंबर | प्रतिनिधि ..
शिरोमणी अकाली दल शिष्ट मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवास स्थानी भेट घेतली असून, शेतकरी बांधवांच्या विविध समस्ये संदर्भात चर्चा यावेळी झाली आहे.
प्रेमसिंह चंदुमाजरा यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाचे प्रमुख प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना वर्षा येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
नांदेड गुरुद्वारा कायदा प्रकरणातील दुरुस्तीबाबतही त्यांची भेट झाली आणि त्यांना अशी कोणतीही दुरुस्ती नको असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भेटी दरम्यान दोन आठवड्यांनंतर दिल्लीत येथे होणाऱ्या बैठकीत आपण भाग घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून, आम्हाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे देखील .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिरोमणी अकाली दल शिष्ट मंडळाने म्हटले आहे.
ब्यूरो रिपोर्ट, मुंबई..