Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

शिर्डी,प्रतिनिधी – संजय महाजन

      श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २४ ऑक्‍टोबर पासून सुरु असलेल्‍या श्रीं ची पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते  दहीहंडी फोडून झाली.

उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, त्‍यानंतर पहाटे ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली.

सकाळी ०६.३० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.संगिता बगाटे यांच्‍या हस्‍ते गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.वैशाली ठाकरे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रीं ची पाद्यपुजा करण्‍यात आली. सकाळी १०.०० वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रीं ची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०६.०० वाजता श्रीं ची धुपारती तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.

श्रीं च्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेल्‍या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळीत साईभक्‍तांनी भरभरुन दान दिले. यामध्‍ये गहु, तांदुळ, बाजरी, ज्‍वारी, तुरदाळ, मुगदाळ, मसूरदाळ, हरभरा, हरभरादाळ, रवा, शेंगदाणा, गुळ, साखर, शुध्‍द देशी तुप व खाद्य तेल आदींव्‍दारे २,८५,२७२/- रुपये व रोख रक्‍कम ७०,३०८/- रुपये अशी एकुण ३,५५,५८०/- रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्‍दारे प्राप्‍त झाली. तसेच श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर हैद्राबाद येथील साईभक्‍त सुनिल शहा यांनी १५१५ ग्रॅम वजनाची सुमारे ९१ हजार रुपये किंमतीची चांदीची परडी संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली.

पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम झाला .

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली.

या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी वीणा, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी आणि मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्र.कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.संगिता बगाटे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपुजा व आराधना विधी करण्‍यात आली. 

सकाळी ०९.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलणे व समाधी मंदिरात काढण्‍यात आलेल्‍या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्र.कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदि उपस्थित होते. भिक्षा झोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून दान भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचा कीर्तन कार्यक्रम झाला. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन करण्‍यात आले. सायंकाळी ०६.०० वाजता श्रीं ची धुपारती झाली. तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.

यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कोईमतूर येथील दानशूर साईभक्त श्री.नाकाराजा यांच्या देणगीतून 

मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शनि शिंगणापूर येथील शनेश्‍वर लाईट डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई केली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

satta king gali