मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा’ या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका रेश्मा बोडके यांनी घेतली आहे.
या मुलाखतीत राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय, बीच शॅक धोरण, तीर्थक्षेत्र पर्यटन, फलोत्पादन विभागाच्या योजनांना देण्यात येणारी गती, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या योजना व उपक्रम, रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला व विकासाला देण्यात येणारी गती, निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान व शासनाकडून करण्यात आलेली मदत, कोविड कालावधीत उद्योग विभागासाठी घेण्यात आलेले निर्णय यासंदर्भात सविस्तर माहिती राज्यमंत्री तटकरे यांनी दिली आहे.