जळगाव,दि.२१….
श्रीराम भक्त संत जलाराम बाप्पा यांची २२१ वी जयंती जय जलाराम संस्थान ट्रस्ट चे जलाराम नगर येथील जलाराम मंदिरात साजरी करण्यात आली. कोरोना संकटाचा काळ असल्याने शासनाने दिलेले नियम पाळून साध्या पद्धतीने यंदाची जयंती साजरी करण्यात आली. गिरणा नदीच्या किनाऱ्यावर संत जलाराम बाप्पा यांचे भव्य मंदिर असुन, श्री गणेश,
श्रीरामचंद्र भगवान, सिता माता, लक्ष्मण भगवान, श्री हनुमान आणि संत जलाराम बाप्पा यांच्या विलोभनीय मूर्ती आहेत.जयंती निमित्त यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली.
दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील,
माजी आमदार गुरुमुख जगवाणी,
आमदार राजू मामा भोळे
यांनी देखील संत जलाराम बाप्पा मंदिर येथे भेट देत पूजा आरती केली.यावेळी त्यांनी प्रसाद घेत कोरोना संकट टळू देण्याचे साकडे यावेळी संत जलाराम बाप्पा यांना घातले. यावेळी जय जलाराम संस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष किशोर पटेल,सचिव हसू सेठ,रजनी शाह,मोहन वाघेला,राजेंद्र बुध्ददेव, जवाहर पटेल,देवराम पटेल,खजिनदार परिमल मेहता, पराग सुरतवाला,तुषार पटेल,जयू जानी,पुरुषोत्तम लिमडा,विजय मदानी,स्वामी पाटील मंदिराचे पुजारी अजित ठाकर, योगेश ठाकर,रोहित शुक्ल आणि सर्व भक्त परिवार उपस्थित होते. तेजल वनरा,भाग्यश्री चव्हाण,निधी चव्हाण, पायल वाघेला यांसह युवतीं आणि युवकांनी यावेळी सहकार्य केले.
दरवर्षी महाप्रसाद असतो मात्र या वर्षी कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेता जय जलाराम संस्थान ट्रस्ट ने बुंदी आणि गाठी शेव प्रसादरुपी बंद पाकिटात भक्तांना वितरित केले.
तर आमदार चंदुभाई पटेल यांनी दोन सोलर लाईट जलाराम मंदिर परिसरात व्यवस्था केलेली आहे.