IMG 20201125 150052
Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

एरंडोल |प्रतिनिधि

जिल्ह्यासह राज्य पातळी, शिक्षण,सामाजिक संघटनात्मक क्षेत्रात मानवतावादी दृष्टिकोनातून सर्व जातीपाती , सर्वधर्मीय, सर्वपक्षीय गोतावळ्यात सर्वांच्या मदतीला धावून जाणारे तसेच एक उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले किशोर पाटील कुंझरकर यांची मराठा सेवा संघ प्रणित डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या पश्चिम भारताच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाचे विविध पदांवर त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे कार्य केले असून सामाजिक ,शैक्षणिक, साहित्य सांस्कृतिक क्षेत्राचा राज्याचा व देशाचा गाढा अभ्यास असलेले प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची संपूर्ण राज्याला ओळख आहे. आपल्या अमोघ वक्तृत्व व अभ्यासपूर्ण भाषणांनी संपूर्ण देशात परिचित असलेले किशोर पाटील कुंझरकर हे राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव ,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव असून सदरील कार्य सुरू ठेवण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे.

सदरील निवडीमुळे त्यांना देशपातळीवर राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मांडायला पोषक बळकटी मिळणार आहे.राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या पश्चिम भारत विभाग राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार तसेच मराठा सेवा संघ प्रणित डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ.नामदेव दळवी , मराठा सेवा संघाचे पश्चिम भारताचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील,यांनी पाठवलेले निवड पत्र प्राप्त झाले असून या निवडीने एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचा व प्रामाणिक धडपडीचा यथोचित सन्मान केला आहे.

IMG 20201125 WA0026

सदरील यथोचित निवडीबद्दल मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षांच्या प्रदेश , राष्ट्रीय अध्यक्ष सह सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या पश्चिम भारताच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पुढील तीन वर्षासाठी किशोर पाटील कुंझरकर यांच्यावर सर्वानुमते सोपवण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी त्यांना पाठवले आहे.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष मधुकर मेहकरे तसेच राज्य जिल्हा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

समाजव्यवस्था तील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन माणुसकी व मानवता या दृष्टीने कार्य करणारे किशोर पाटील कुंझरकर हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कुंझर या गावचे रहिवासी असून सध्या एरंडोल तालुक्यात सेवा बजावत आहेत. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक संघटनात्मक भरीव कार्याची दखल घेऊन यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासनाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले असून , जळगाव जिल्हा परिषद ने देखील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. बेटी बचाव बेटी पढाव, जिल्हा परिषद शाळा टिकवा, स्वतःची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकवणे,कृतिशील अनुकरणीय उपयुक्त नाविन्यपूर्ण प्रयोगाची अंमलबजावणी करणे, राज्यात सर्वत्र उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देणे,कोणी निंदा कोणी वंदा सरळ मार्गाने चांगल्या कार्यात पुढाकार घेणे हा त्यांचा स्वभाव असून राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य महासचिव तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव म्हणून ते यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत.राज्यस्तरावर अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.

सामाजिक कार्याची त्यांची धमक , राज्य राष्ट्रीय पातळीवरील दांडगा जनसंपर्क इंग्रजी मराठी हिंदी भाषेवरील प्रभुत्व बघून मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या पश्चिम भारताच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करून पुढील तीन वर्षासाठी जबाबदारी सोपवली आहे. एम ए जनसंवाद पत्रकारिता, डीएड करून शिक्षक असलेले आणि संघटनात्मक सामाजिक कार्य क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले किशोर पाटील कुंझरकर यांचे निवड करण्यात आली आहे.संपूर्ण महाराष्ट्रासह खानदेश मधून शिक्षण, सहकार ,राजकारण साहित्य , पत्रकारिता , उद्योग, मंत्रालय पातळीवरील सर्व कक्ष सर्व मित्रपरिवार तसेच सर्वपक्षीय राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यां मार्फत आणि सर्व शिक्षक संघटनेच्या सर्व राज्य व जिल्हा कार्यकारणी , महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समिती तसेच सर्व शैक्षणिक साहित्य ,सामाजिक, पत्रकारिता , उद्योग, सहकार सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपूर्ण देशात मराठा सेवा संघाची विचारधारा पुढे नेण्यासाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून पश्चिम भारताच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेवर किशोर पाटील कुंझरकर यांचा सरळमार्गी, मनमिळावू प्रेमळ तसेच वेळप्रसंगी आक्रमक अभ्यासूपणा असलेला स्वभाव पाहून व आजपर्यंतचे कार्य पाहून एक अभ्यासू उच्चविद्याविभूषित मनमिळाऊ आणि राज्यातील देशातील सर्व क्षेत्रांचा चिकित्सक अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव पुढे आल्याने सर्वानुमते आपण त्यांची निवड करीत असल्याचे निवडी संदर्भात पाठवलेल्या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्राध्यापक नामदेव राव दळवी , डॉक्टर संजय पाटील यांनी म्हटले.

सदरील अतिरिक्त जबाबदारी आपण सर्वांच्या आशिर्वादाने सहकार्याने प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांनी मला सर्व पातळीवर समजून घेऊन सहकार्य करावे असे या निवडी प्रसंगी बोलताना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे नुतन राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. आपल्या शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या संघटनात्मक इतर कार्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल यामुळे सर्वानुमतेआपण ही जबाबदारी स्विकारली असून सर्वांना सोबत घेऊन सर्वांसाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे तसेच आवड मराठा सेवा संघाचे कार्य करण्याची आहे असे त्यांनी म्हटले.सदरील धडपडी व्यक्तिमत्त्वाचा योग्य सन्मान झाल्याने यथोचित निवडीबद्दल राज्यातील मराठा सेवा संघाच्या सर्व जिल्हाध्यक्षांसह राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी व ३३ कक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीने, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य कार्यकारिणीने तसेच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी स्वागत व अभिनंदन केले आहे. सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

error: Content is protected !!
satta king gali