मुंबई, दि.७
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन (टीव्ही पत्रकार संघटना) ची निवडणूक घेण्यात आली याचा निकाल आज रात्री लागला असून ,अध्यक्ष पदी विनोद जगदाळे, उपाध्यक्ष पदी कल्पेश हाडकर यांनी निवडणूक जिंकत पदभार स्वीकारला आहे.
यांसह सचिव राजेश मालकर ,सहसचिव अक्षय कुडकेवार, कोषाध्यक्ष राजीव रंजन तर सदस्य पदी संदीप पाटील,राजू रेवणकर,सुरेश साहिल,समीर शेळके,अजित शिवतारकर, संतोष पानवलकर,सर्वेश तिवारी,राजू सोनवणे,मनश्री पाठक आणि उर्वशी खोना यांनी विजय प्राप्त केला आहे.
निवडणूक जिंकल्यानंतर निवड झालेल्या टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन (टीव्ही पत्रकार संघटना) चे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत एकच जल्लोष केला असून, फोन कॉल्स वरून विविध क्षेत्रांतील मान्यवर हे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.