मुंबई, दि. 1 : बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठाभाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.