Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

धरणगाव | विनोद रोकडे

शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी ३० वर्ष संघटना सांभाळली, ती वाढवली, संघटीत केली म्हणून आम्ही आमदार, खासदार, मंत्री झालो. कोणतिही निवडणूक न लढवता त्यांनी केलेली जनतेची कामे यामुळेच संपूर्ण जिल्हा त्यांना लोकनेता मानतो असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. ते गुलाबराव वाघ यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. गुलाबराव वाघ जिल्हा सांभाळतात म्हणूनच मी राज्यात जनतेची कामं करत फिरु शकतो. त्यांच्या सल्ल्याशिवाय मी कोणतेही निर्णय घेत नाही असं सांगून त्यांनी दोघांमधील समन्वय किती मजबूत आहे ? हे स्पष्ट केले.नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि मित्र परीवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.                     

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. गुलाबराव वाघांच्या राजकीय, सामाजिक, संघटनात्मक आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणून विविध पैलूंवर प्रकाश टाकला.तर माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी गुलाबराव वाघांच्या पक्ष निष्ठेचे तोंड भरुन कौतुक केले. चर्मकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानूदास विसावे यांनी वाघांच्या पारदर्शी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची दखल घेतली. उमविचे सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील यांनी वाघ आपल्या आरोग्याबद्दल सजग असल्याचे सांगत त्यांनी मिळवलेल्या विश्वासार्हतेचं कौतुक केलं. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी भाऊंनी कोरोना काळात केलेले काम आणि लवकरच सुरु होणाऱ्या १३ कोटी च्या कामात भाऊ करत असलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला. काँग्रेस प्रदेश चिटणीस यांनी गुलाबभाऊंच्या संयमी राजकारणाची स्तुती करत ते बोलण्यापेक्षा काम करुन दाखवण्यावर भर देतात याची उदाहरणे दिली.                  

 सत्काराला उत्तर  देताना भारावले गुलाबराव वाघ  .

आपल्या वाढदिवसाला सर्वपक्षीय सर्वोच्च नेते आलेत हीच माझी श्रीमंती आहे असं ते म्हणाले. कुणालाही लहान करण्यापेक्षा स्वतःला स्वतःच्या हिंमतीवर मोठे करण्याचा प्रयत्न करतो असं ते म्हणाले. मी बाळासाहेंबात देवरुप पाहतो. सत्तेपेक्षा सेवेला, मनीपेक्षा मानवतेला आणि पदापेक्षा कार्यकर्त्याला जपतो म्हणून माझ्यावर लोक प्रेम करतात असं ते म्हणाले. भविष्यातही आपण अशीच जनसेवा व पक्षसेवा करु.

 – शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ

आ. लताताई सोनवणे, आ. चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, पंस. सभापती मुकुंद नन्नवरे, उद्योगपती जिवनसिंग बयस, माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई  वाघ, महिला जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, जि. प. सदस्य गोपाळ चौधरी,  मनपा वि.पक्ष नेते सुनिल महाजन, शिवसेना जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, तालुका प्रमुख गजानन पाटील, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, एरंडोल तालुका प्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील,  धरणगाव शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे,  माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, सुरेखा विजय महाजन, अंजली विसावे ,धरणगाव उपनगराध्यक्ष कल्पना महाजन , शिवसेना नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन , भागवत चौधरी, विजय महाजन,बापू पारेराव, उज्वला परेराव, नंदू पाटील ,आराधना पाटील, अहेमद पठाण, कीर्ती मराठे ,जितेंद्र धनगर ,मंदा धनगर,अजय चव्हाण, पर्वताबाई पाटील शरद पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे,भरत  चौधरी , योगेश वाघ, संजय चौधरी , बुट्या पाटील , समाधान पाटील,राहुल रोकडे, कमलेश बोरसे,रवींद्र जाधव,  छोटू जाधव यावेळी  उपस्थित होते .

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजित पाटील यांनी केले तर आभार विनोद रोकडे यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत काळजी घेण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हाभरातून नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, मित्र परीवार उपस्थित होते.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

satta king gali