Share this!
लंडन, 9 फेब्रुवारी
ब्रिटनच्या राजकुमारी युजेनी यांनी एका मुलाला जन्म दिला. बकिंघम पॅलेसने मंगळवारी ही माहिती दिली.
युजेनी ही राणी एलिझाबेथ II ची नात. मंगळवारी सकाळी राजकुमारी आणि तिचा नवरा जॅक ब्रूक्सबँक यांनी लंडनच्या पोर्टलँड हॉस्पिटलमध्ये नवजात मुलाचे स्वागत केले.
युजेनीचे पालक प्रिन्स अँड्र्यू आणि डचेस ऑफ यॉर्क सारा आहेत. राजकुमारीचे हे पहिले मुल आहे.