IMG 20210206 165701
Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

जळगाव, दि ०६..

नुकतेच प्रजासत्ताक दिनी २६जानेवारी ला दिल्ली राजपथ येथे झालेल्या संचलनात ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून यशस्वीपणे कामगिरीबद्दल मूळजी जेठा महाविद्यालय टी.वाय.बी.कॉम विद्यार्थिनी तथा एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत हीचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

IMG 20210206 165845

सत्कार सोहळ्यास के.सी.ई. संस्थेच्या मूळजी जेठा महाविद्यालातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी, कर्नल श्री प्रविण धिमन, जिल्हा अधिकारी श्री अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस.एन.भारंबे हे मान्यवर उपस्थित होते .

IMG 20210206 165701 1

१८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन आणि महाविद्यालय तर्फे छात्र सैनिक समृद्धी संत हिचा औपचारिक सत्कार स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्प देत यावेळी समृध्दी चा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्राम्हण सभा, युवा शक्ती यांनी देखील तिचा सत्कार केला. माजी एन.सी.सी.अधिकारी तथा कलाशाखेचे प्रमुख लेफ्ट. डॉ.बी.एन.केसुर, सुभेदार मेजर कोमल सिंग,समृद्धीचे पालक,छात्र सैनिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन एन.सी.सी.अधिकारी लेफ्ट.डॉ.योगेश बोरसे यांनी केले.

IMG 20210206 170219

एन.सी. सी. राष्ट्राच्या जडण घडणीत एक महत्वाचा घटक आहे. समाजाला आदर्शवत तसेच चारित्र्यवान संपन्न बनविण्यात छात्र सैनिकांचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात या छात्र सैनिकांना विवेक बुद्धेने निर्णय घेण्यासाठी एन.सी.सी.चे प्रशिक्षण खूप असते. या साठी त्यानी मूळजी जेठा महाविदयालय प्रशासन आणि एन.सी.सी. अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.

– कर्नल प्रविण धिमन

भारताला शिस्त प्रियसमाजाची आजच्या घडीला आवश्यकता असून एन.सी.सी. मधील शिस्त आणि संयमाचे यात मोठे योगदान आहे. समृद्धी संत यांचे यश जळगाव वासिंयाना प्रेरणा देणारे आहे.छात्र सैनिकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
IMG 20210206 165826

स्वतः एन.सी.सी. छात्र सैनिक होतो. योग्यवेळी योग्य मार्गदर्नाशानामुळे युवक घडत असतो.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे
IMG 20210206 165759

समृद्धीच्या यशात प्रशिक्षक आणि शिक्षक यांचे मोलाचे योगदान असते. तसेच अनेक विद्यार्थिनींना केवळ आई- वडिलांनी सहयोग न केल्यामुळे यशापर्यंत पोहचता येत नाही. यासाठी सजग पालकांचा अशा यशात मोलाचा वाटा आहे.

प्राचार्य प्रा. डॉ. एस.एन. भारंबे

या वर्षी एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती. अमरावती एन.सी.सी. ग्रुपआणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन मधून समृद्धी एकमेव छात्र सैनिकाची निवड झाली होती.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

error: Content is protected !!
satta king gali