IMG 20201115 WA0014
Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
8 / 100

शिर्डी | प्रतिनिधी

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भावामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता येताना साईभक्‍तांनी ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. तसेच पालखी घेऊन येणा-या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी घेवून येण्‍याचे टाळावे.

जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे.

अजुनही कोरोनाचे सावट संपलेले नसुन, सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे गुरुवार, शनिवार, रविवार व सलगसुट्टयांच्‍या कालावधीत गर्दी होवु नये म्‍हणुन साईभक्‍तांनी शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येताना श्री साईबाबा संस्‍थानच्‍या http://online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन दर्शन पास घेवूनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच, दर गुरुवारी शिर्डी आणि पंचक्रोशितील नियमीत येणा-या भाविकांनी श्रीं चे दर्शनासाठी मोफत बायोमॅट्रीक पास घेवून मंदिरात प्रवेश करावा. मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना, १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया आणि ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींस मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार ,इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे.


तरी कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्‍यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. तसेच पालखी मंडळाचे पदाधिका-यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

error: Content is protected !!
satta king gali