0
भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना चेतावणी देऊन निवेदन देण्यात आले की, कोरोना महामारी मुळे शेतकरी, व्यावसायिक बेरोजगार झाले होते त्यामुळे ते जेमतेम उपजीविका भागवत आहे आणि महाविकास आघाडी सरकार वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत आहे.
महाविकास आघाडी सरकार मधील ऊर्जामंत्री यांनी घोषित केले होते की शेतकऱ्यांना १००% वीजबिल माफी करण्यात येईल व घरगुती वापर असलेल्या ग्राहकांना १०० युनिटवर ३०% वीजबिल माफी करू. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी न करता क्रूरपणे कोरोना काळातील थकबाकीदार शेतकरी, व्यापारी यांना कोणतीही लेखी सूचना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. हा जनतेवर होत असलेला अन्याय भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.असे भाजप चे पदाधिकारी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल हे शेतकरी विरोधी सरकारने लक्षात ठेवावे. त्यासाठी महावितरणला निवेदन देण्यात आले. रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्रजी फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर,तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष अंकुश चौधरी, कर्की सरपंच दत्ताभाऊ पाटील, नरवेल सरपंच मोहन महाजन, सुनील महाजन,संतोष खोरखोडे,पंकज पाटील,विशाल महाजन,अतुल महाजन,काशिनाथ कोळी,ईश्वर मिस्तरी व सर्व शेतकरी बंधू ,कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.