शिर्डी | प्रतिनिधी – संजय महाजन..
15 फेब्रुवारी ला तब्बल 11 महिन्यांनंतर महाविद्यालय उघडले, विद्येची मंदिरे इतक्या मोठ्या कालावधी नंतर चालू झाली.हे औचित्य साधत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डी शाखेतर्फे श्री साईबाबा सिनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी रांगोळी काढण्यात आली होती. प्रत्येक विध्यार्थ्यास आणि प्राध्यापकांस मास्क आणि गुलाबाचे फुल देवून यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य विकास शिवगजे आणि प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वत्र विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसून येत होता. महाविद्यालय सुरू झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.