IMG 20201229 WA0052
Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

शिर्डी,दि.२९.. | प्रतिनीधी..

चंदीगढ येथील तृतियपंथी समाजाच्‍या साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली. याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन आभार मानले.
यावेळी साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकारी म्‍हणाल्‍या की, आम्‍ही सर्व चंदीगढ येथून अनेक ठिकाणी भेट देत-देत शिर्डी येथे आलेलो आहोत. श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आम्‍हाला सर्वांना आत्‍मीक शांती मिळाली. आम्‍हाला या ठिकाणी चांगली शिस्‍त बघायला मिळाली. श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने कोव्‍हीड-१९ च्‍या पार्श्‍वभूमीवर अतिशय चांगल्‍याप्रकारे उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत. सर्व साईभक्‍त मास्‍कचा वापर व सामाजिक अंतराच्‍या नियमांचे पालन करताने दिसत आहेत. दर्शन व्‍यवस्‍थेबाबत कुणाची कुठलीही तक्रार नाही.
संस्‍थानच्‍या वतीने कोव्‍हीड-१९ च्‍या पार्श्‍वभुमीवर केलेली व्‍यवस्‍था ही साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने हिताची असुन सर्वांनी नियमांचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या दर्शनाचा लाभ घ्‍यावा, असे सांगुन लवकरच कोरोनाचे सावट संपावावे अशी प्रार्थना ही सोनाक्षी व त्‍यांच्‍या सहकार्यांनी साईचरणी केली.
सरदचे साईभक्‍तांनी देणगी दिलेली असल्‍याने संस्‍थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्‍ध असूनही त्‍यांनी त्‍यास नम्रपणे नकार देऊन विहीत मार्गानेच दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले. काही महिला भक्‍तांकडून दर्शन आरती व दर्शनासाठी देणगीची मागणी केली जाते या तथाकथीत बातमीच्‍या पार्श्‍वभूमीवर सदरची बाब निश्चितच स्‍पृहणीय आहे. संस्‍थानच्‍या वतीने या सर्वांना हार्दिक धन्‍यवाद देण्‍यात आले.

IMG 20201229 WA0058

श्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबांचे समाधी मंदिर,

IMG 20201229 WA0062

लेंडीबागेतील श्री दत्‍त मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. दिल्ली येथील साईभक्त श्रीमती रंजनी डंग यांच्या देणगीतुन फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.

ब्यूरो रिपोर्ट एस बी एन टाइम्स न्युज ..

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

error: Content is protected !!
satta king gali