शिर्डी,प्रतिनीधी संजय महाजन | कोपरगांव,काकडी ..
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा साईधाम हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.स्वप्नील मानें हे मोफत कॅन्सर तपासणी आणि जनजागृती अभियान राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवितात.यंदा देखील २७०वा कॅन्सर डिटेक्शन अँड अव्हेरनेस कॅम्प साईधाम हॉस्पिटल च्या माध्यमातून मारुती कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील मारुती मंदिरात आयोजित करण्यात आला. यात अनेक गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली.
तालुकाध्यक्ष विठ्ठल भुजाडे-कोपरगाव,अध्यक्ष जुनेद भाई इनामदार-राहुरी आणि राकेश भोकरे- राहाता तसेच शिर्डी शहराध्यक्ष ऋषिकेश कुरकुटे,जावेद सय्यद,जुबेर शेख, यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विक्रांत वाघचौरे,राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज शिंदे,राष्ट्रीय सरचिटणीस गणेश वाघचौरे,राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी अशोक लांडगे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन पाटील,महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी विवेक साळवी,मुंबई विभाग लीगल सेल प्रमुख अॅड.अभय सोडिये,पोलीस ग्रीवीयंन्स सेल अध्यक्ष नितीन सोनवणे,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष जब्बार शेख आणि जिल्हा अध्यक्ष इरफान शेख यांनी या समाजोपयोगी उपक्रमास शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले आहे.