शिर्डी | प्रतिनिधी – संजय महाजन ..
साईदर्शनासाठी संगमनेर तालुक्यातील साकूर फाट्याजवळील पिंपळगाव देपा येथील पदयात्री घेऊन आलेल्या साईपालखीचे साईनिर्माण उद्योग समूह आणि कोते परिवाराच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
पिंपळगाव देपा येथील गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी साई पालखीचे आयोजन केले जाते. यंदाचे हे पाचवे वर्ष होते. कोते परीवाराच्या वतीने साईनिर्माण उदयोग समुहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांच्या नेतृत्वाखाली साईनिर्माण करीअर अॅकॅडमीचे कार्यकारी संचालक ताराचंद कोते, माजी नगरसेवक सविताताई कोते यांनी स्वागत करत पालखीचे पुजन केले. यावेळी पालखीचे आयोजक मगन गुंड, पंकज राऊत, बाबासाहेब गांजवे, ज्ञानेश्वर गुंड, बाळासाहेब गांजवे, प्रदीप गुंड, ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कोते परिवाराच्या वतीने वर्षभरात शेकडो पालख्यांचे स्वागत करण्यात येते. साईबाबा आमच्या हातून ही सेवा करून घेतात. आम्ही हे आमचे भाग्य समजतो, असे विजयराव कोते, ताराचंद कोते यांनी सांगितले.