IMG 20210214 WA0073
Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

शिर्डी | प्रतिनिधी – संजय महाजन

हिंदू शास्त्राच्या आधार म्हणजे संत वचनाचे पालन आहे. ते पालन ग्रीन एन क्लिन शिर्डी करत असून,त्यांच्या माध्यमातूनच शिर्डी परीक्रमाचा प्रचार आणि प्रसार होत आहे. ही परीक्रमा संत मंडळास मान्य असून पुण्य साध्य करण्याचा मार्ग आहे. शिर्डीतील खंडोबा मंदीरात आयोजित परीक्रमा प्रचार,प्रसाराच्या शुभारंभ प्रसंगी महंत काशिकानंद महाराज यांनी मौलिक मार्गदर्शन केले. खंडोबा मंदीरात काशिकानंद महाराज यांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करण्यात आली. ज्योत प्रज्वलन महाराजांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रीन एन क्लिन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, उपनगराध्यक्ष सचिन कोते,सचिन तांबे,मणिलाल पटेल, प्रा.रघूनाथ गोंदकर, ॲड.अनिल शेजवळ,संजय शिर्डीकर,छोटूभाई भाटीया, डॉ.धनंजय जगताप,प्रा.रघुनाथ गोंदकर, दादासाहेब काळे,रविकीरण डाके, प्रसाद वेद,महेश वैद्य, प्रा.विशाल तिडके,मयूर चोळके,सागर वाल्हेकर, नरेश सोनवणे,नितीन शिंदे,संतोष बनसोडे, प्रथमेश मेहेर,दिलीप गोंदकर,तुषार महाजन,अक्षय गोंदकर यांसह परिक्रमेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

साईबाबांनी जे काही उपक्रम सुरु केलेत ते आजतागायत सुरु आहेत.त्या धर्तीवर ग्रीन एन क्लिन शिर्डी माध्यमातून शिर्डी परीक्रमा सुरु झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत खडतर काळात ही परीक्रमा सुरु झाली. त्यानंतर या दुस-या वर्षीही सुरु आहे. कोणत्याही कार्यात सातत्य राहील्यास ते कार्य पुर्ण फळाला जाणारा हा स्तूत्य उपक्रम आहे.
नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पूण्या नाही गणना. ही प्रदक्षिणा अनंत पुण्य प्राप्त करून देणारी आहे. या माध्यमातून भाविकांना तप,जप, मिळणार आहे. त्यासाठी येत्या दि.15 मार्च रोजी होणा-या शिर्डी परीक्रमेचा भाविकांनी लाभ घ्यावा. उत्तरोत्तर हा उपक्रम वाढीस जाणार असल्याचा विश्वास काशिकानंद महाराज यांनी यावेळी व्यक्त केला.

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

error: Content is protected !!
satta king gali